Thursday, 13 March 2014

किस्सा

किस्सा ...
आपल्या लहानपणी आपला लवकर मोठे होण्याचा विचार किती फोल होता  हे बर्‍यापैकी मोठ झाल्यावरच  कळतं.मग कधी कधी आठवतात आपल्याला आपल्या लहानपणीचे किस्से.....
लहानपणी आपण मोठे होण्यासाठी अगदी धडपडत असतो, पण मोठे होतो आणि दुनियादारी कळायला लागते तेंव्हा कळतं की किती फोल अट्टहास होता मोठे होण्याचा. अगदीच लहान असताना म्हणजे बालवाडी /अंगणवाडी (आता याला Sr KG, Jr KG यासारखी नवीन आचकट इंग्रजी  नाव आहेत ) मध्ये असताना शाळा दुपारी सुटायची. तेंव्हा पहिली दुसरी ला असणाऱ्या  पोरांकडे बघून कुतूहल वाटायचं .पण मग जेंव्हा पहिली दुसरी ला पोचलो तेंव्हा शाळा 5 वाजता सुटायला लागली  आणि मग दिवसभर 5 च्या टोल्याककडे (घंटा) लक्ष ठेऊन असायचो. ज्या वेळी 5 चा टोला पडेल तेंव्हा दफ्तर पाटीवर टांगायाच आणि पळत सुटायचं...जस काही अंदमान निकोबार च्या बेटावरून काळ्या पाण्याच्या शिक्षेतून पळून निघालोय !
का कुणास ठाऊक शाळा सुटण्याचा आनंद एवढा असायचा की काय करू आणि काय नको व्हायचं . मग आपसूक तोंडातून एक गान गुणगुणल जायचं ...शाळा सुटली पाटी फुटली! .....या गाण्यात  शाळा सुटली या शब्दामद्धे आनंद आणि पाटी फुटली या शब्दामद्धे दिवसभर आलेला कंटाळा व्यक्त व्हायचा.  अन मित्रांनो  गम्मत म्हणजे  जर तुम्ही , ही गाणी तुम्हाला कुणी शिकवली हे आठवण्याचा प्रयत्न कराल तर तुमची पन्नाशी  उलटली तरी तुम्हाला काही आठवणार नाही. कारण अशी बरीच गाणी आपण सेकंदात उचलायचो. अन मुख्य म्हणजे ही गाणी आपण मित्रामध्ये मध्येच गुणगुणायचो, कारण मास्तरांच्या (सर्व गुरुवर्यांची माफी मागून मास्तर हा शब्द वापरतो कारण हा शब्द बराच जवळचा वाटतो ) समोर ही गाणी असभ्य असतात नाही का..? अन अशी जबरदस्त गाणी आपण अगदी ताला सूरात गुणगुणायचो आणि काही आचकट विचित्र गाणी जी मी इथे जाहीर नाही करू शकत, आपण कुठून शिकायचो काही  कळत नाही..
        शाळेतून पळून जाणे हा एक जबरदस्त thrilling स्टंट असायचा. सगळं कौशल्य अगदी पणाला लागायचं .आमच्या वेळेची गोष्ट अशी की आम्ही आमच्यातल्याच एका मित्राला मास्तरांच्या गैरहजेरीत बाहेर वर्गाच्या खिडकीत उभं करायचो अन मग एक एक करून प्रत्येकाच दफ्तर खिडकीतून बाहेर टाकायचो. अन मग कधी कधी एखाद्याच दफ्तर खिडकीतून बाहेर जायच नाही. ज्याचं दफ्तर असायच त्याला मेल्याहून मेल्यासारखे  व्हायचं. मग एखादा मास्टर माइंड त्याला 4 शिव्या घालून त्याचे दफ्तर अर्धे रिकामे करून बाहेर पाठवायचा आणि उर्वरित भाग नंतर. एवढं सगळ करून देखील पुढे एक गंभीर प्रश्न असायचा की एवढ्या लवकर घरी जाऊन सांगायच काय..?? ज्यांच्या घरी दुपारी कोणी  नसायच त्यांना थोड कमी tetion, पण ज्यांच्या घरी दुपारी कोणी तरी घरचे असायचेत त्यांना भीती वाटायची. मग काय 5 वाजेपर्यंत गावात उनाडक्या करायच्या ,त्या पण लपून छपून कारण गावातल्या एखाद्या नगाला जर आमची गॅंग दिसली की घरात पोट भरून मार मिळण्याची जबरदस्त भीती  वर घरात चुगली होईल ति वेगळीच ( त्यावेळी अशा नगांचा भयंकर राग यायचा पण सध्या त्यांच्याकडे पहिले की राग नाही पण हसू मात्र येत ). शाळेच्या वेळेत उनाडक्या करून  काही घडलेच नाही अश्या आविर्भावात 5 वाजता घरी हजर होणे अशी योजना यशस्वी करायचो . इथपर्यंत जर सुरळीत झाले तर मग दूसरा दिवस,दुसर्‍या दिवशी शाळेत जरा दबकूनच वागायच ठरलेलं असायचं , अन मग तिसर्‍या दिवशी योजना यशस्वी अन पूर्ण झाली असा शिक्का मोर्तब व्हायचा.
या २ दिवसाच्या कालावधीत कुठेजरी पळून जाण्याचा प्रयत्न असफल झाला तर परिणाम फार भयंकर वाईट व्हायचेत कारण शिक्षा ही एकाकडूनच व्हायची नाही. १.घरात (कुटुंबातल्या सगळ्या मोठ्या व्यक्ति आजी आजोबा सोडून )२. शाळेत (एकच मास्तर shock देईल का याची खात्री नाही) आणि ३. गावातले काही शिस्तप्रिय नग ....जाम वाईट अवस्था होऊन जायची..

आता जर असे किस्से आठवले तर हसून हसून पोट दूखेल पण त्यावेळच्या फीलिंग जर जगलात ..तर एका क्षणात अति आनंद आणि अति दु:ख या दोन्ही फीलिंग अनुभवायला मिळतील ... योजना सफल झाल्याचं आठवलात तर क्षणभर जोरजोरात हसाल आणि योजना फसल्या नंतर झालेली वाताहात आठवाल तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ,,,,,,हा हा ....

3 comments: